ग्रामपंचायत निंबाळे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत कोड: 182776
ग्रामपंचायतीची रचना निंबाळे गावाची ग्रामपंचायत ही गावातील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ग्रामपंचायतीची मुख्य जबाबदारी गावातील मूलभूत सेवा आणि विकासकामे करणे आहे:
पाणीपुरवठा,
स्वच्छता,
रस्ते बांधकाम,
सार्वजनिक बांधकाम, इ.

🗺 स्थान

निंबाळे गावाचे स्थान
तालुका: चांदवड (ता. चांदवड)
जिल्हा: नाशिक, महाराष्ट्र
पिनकोड: 423104 (चांदवड तालुका अंतर्गत)

🌾 शेती व पिके

निंबाळे हे एक कृषिप्रधान गाव आहे, ज्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे.
गावातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाचे आयुष्य शेतीवर अवलंबून आहे. येथे विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते, ज्यामुळे या गावाचा ग्रामीण जीवनशैली आणि अर्थव्यवस्था घडली आहे.
मुख्य पीकं: निंबाळे आणि आसपासच्या भागातील शेतीला जलस्रोत आणि मृदाच्या प्रकार प्रमाणे विविध प्रकारचे पीक लागवडीसाठी योग्य आहेत.

समाज रचना

निंबाळे गावातील समाज रचना साधारणतः हिंदू धर्माशी संबंधित आहे, आणि विविध जातीय घटक, समुदाय आणि सामाजिक गट इथे एकत्रितपणे राहतात.

धार्मिक सोहळे आणि सण

निंबाळे गावामध्ये विविध धार्मिक सण आणि सोहळे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात: दिवाळी, होळी, खंडोबा महाराज यात्रा , दैतोबा महाराज यात्रा यांसारखे सण मुख्यतः धार्मिक एकतेचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे, ग्रामदैवत आणि मंदिर पूजे देखील इथे नियमितपणे होतात, ज्या लोकांचे एकत्रित सामाजिक बंध दृढ करतात.

पर्यटन स्थळे

गावाजवळील मंदिरे, तलाव

मुख्य व्यवसाय:

शेती, पशुपालन, लघुउद्योग

पाण्याचा स्रोत

विहीर, नळयोजना

ग्रामपंचायत माहिती

गावाची सर्वसाधारण माहिती

गावाचे नाव : निंबाळे

तालुका: चांदवड

जिल्हा: नाशिक

लोकसंख्या: १९९९

१) स्री: ९६३

२) पुरुष: १०३६

३) एकूण: १९९९

 

क्षेत्र :

१ ) गावाचे एकूण क्षेत्र: ९२१.६६ हेक्टर

२ ) गावठाण: ३.८८

३ ) शेतजमीन : ८०३.५

  • अ ) कोरडवाहू: २४१ हेक्टर
  • ब ) बागायती: ५६२.५५ हेक्टर
  • क ) पडीत: ४७.६७

४ ) वनजमीन: ४७.६७ हेक्टर

 

ग्रामपंचायतिच्या मालकीच्या जमिनी:

१) गायरान: नाही

२) मैदान: होय

 

आठवडे बाजार: नाही

 

व्यावसायिक गाळे: खाजगी

 

सरकारी कार्यालय:

१) तलाठी (चावडी): निंबाळे

२) ग्रा.पं.कार्यालय

३) बँक

४) पोस्ट ऑफिस

 

आरोग्य:

१) उपकेंद्र

३) खाजगी दवाखाने: १

४) पशुवैद्यकीय दवाखाने: निंबाळे

 

शिक्षण , प्रशिक्षण , सुविधा:

१ ) अंगणवाड्या: ३

२) प्राथमिक शाळा:

  • जि.प.शाळा निंबाळे ,
  • जि.प. शाळा गांगुर्डे वस्ती,
  • जि.प.शाळा पाटोळे वस्ती ,

 

घरांची संख्या:

१) पक्की: ३३१

२) कच्ची: २२०

पिण्याचे पाणी:

१) नळ पाणी योजना: ४४ गाव पाणी पुरवठा नळ योजना

२) अन्य व्यवस्था: विहिरीतून

 

सांडपाणी निचरा:

  • गटारी: होय
  • शोषखडे:- होय

 

घनकचरा :

१) घनकचरा निर्गत व्यवस्था: सार्वजनिक कचरा कुंड्या, नाडेफ खत खड्डा , ट्रायसिकल

 

पुरस्कार: नाही

 

संस्था

१) स्वयंसेवी संस्था: गावातील काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था –नाही

२) सहकारी संस्था –

  • विकास सोसायटी निंबाळे विविध कार्यकारी सेवा सह सोसा
  • दुध संस्था
  • पतसंस्था – नाही

 

४) शेतीसाठी प्रतिवर्षी होणारा कर्जपुरवठा –

  • सोसायटी मार्फत पिक कर्ज
  • बँक ऑफ महाराष्ट्र चांदवड यांचे मार्फत कॅश क्रेडिट – CC

 

शेती:    

पिक पद्धती

१) प्रमुख पिके – बाजरी,टोमॅटो, भाजीपाला,कांदे,गहू,मका,सोयाबीन इ.

 

पीकनिहाय क्षेत्र:

बाजरी -४० हेक्टर , मुग – २३ हेक्टर , तूर – २ हेक्टर ,कांदे – ५०० हेक्टर , गहू -४५० हेक्टर, मका- ३९० हेक्टर , सोयाबीन– ६१ हेक्टर

 

फळबागायत :-

१) पपई बाग – १ हेक्टर

 

सिंचनसुविधा:

१) विहिरी -४७०

२) बोअरवेल -

३) शेततळे – ३२

६) तलाव – १

 

 

 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव

पद

संपूर्ण नाव

संपर्क क्रमांक

सरपंच

सौ. रविना विष्णू सोनवणे

७८८७६६४०७३

उपसरपंच

श्री. दिपक आत्माराम घुमरे

७६२०९३०११४

ग्रामसेवक

श्री. योगेश दादा पापळ

७५८८१९५२२५

सदस्य

सदस्य

सदस्य              

सदस्य

सदस्य              

सदस्य

सदस्य

सौ.. सुनिता सचिन सोनवणे

श्री.नंदू माधवराव चौधरी

श्री.छगन शंकर घोलप  

सौ. लताबाई बाळकृष्ण गांगुर्डे

सौ.रत्ना राजाराम चीतणार

सौ. लताबाई अरुण गांगुर्डे

सौ.मनीषा रवींद्र सोनवणे

७९७२३३८१८०

८२०८५७४०१२

७७१९९८१५४१

७५८८८५५९८३

९०९६१६१९९१

९७६३५६८२११

८३२९१३६७०६

संगणक परिचालक

रोजगार सेवक

कर्मचारी

पाणीपुरवठा कर्मचारी

श्री.अमोल भगवान दरेकर

श्री.नंदू विश्वास गांगुर्डे

अविनाश काळू संसारे

श्री.दादा शाहीनाथ आहिरे

९०११९९३९७७

९८३४४१६१३७

९०७५२७९८२५

७६२००६५९४८

विकास कामे – माहिती आणि फोटो

क्र.

कामाचे नाव

वर्ष

निधी

स्थिती

रस्त्याची डांबरीकरण

२०२४

₹५,००,०००

पूर्ण

पाणीपुरवठा योजना

२०२३

₹३,५०,०००

प्रगतीत

अंगणवाडी दुरुस्ती

२०२२

₹१,५०,०००

पूर्ण

ग्रामपंचायत आदर्श तक्ता

आदर्श घटक

तपशील

स्वच्छता

गाव स्वच्छ ठेवण्यावर भर

पाणीपुरवठा

नियमित आणि शुद्ध पाणी उपलब्ध करणे

शिक्षण

प्रत्येक मुलासाठी शाळेचे प्रवेश सुनिश्चित करणे

आरोग्य

प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करणे

पर्यावरण

वृक्षारोपण आणि जलसंधारण

शिक्षण संस्था यादी

क्र.

संस्थेचे नाव

प्रकार

संपर्क

जिल्हा परिषद शाळा

प्राथमिक

 

आरोग्य संस्था यादी

क्र.

संस्थेचे नाव

प्रकार

संपर्क

 

 

 

 

उपकेंद्र

प्राथमिक उपचार

७७४१९२६१४२

वैद्यकीय दवाखाना

खासगी

९४२३०७५४११



लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
1000
महिला
900
गृहसंख्या (घरांची संख्या):
500
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

धार्मिक स्थळ / उत्सव /परंपरा

श्री निंबकेश्वर महादेव  मंदिर

निंबाळे येथे आराध्य दैवत श्री निंबकेश्वर महादेव  मंदिर हे  सुंदर मंदिर आहे.गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांचे मतानुसार सादर मंदिर हे १९१२ पासून अस्तित्वात असून ते अति प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे .श्री निंबकेश्वर महादेव  मंदिर वरून गावाचे नाव निंबाळे असे पडले आहे अशी आख्यायिका आहे. श्री निंबकेश्वर महादेव  मंदिर हे गावातील जागृत देस्थान असून  ग्रामस्थांचे श्रद्धा स्थान आहे दरवर्षी श्रावण महिन्यात त्रंबकेश्वर येथील कुशावर्त तळ्यावरील पाण्याची कावड अतिशय भक्ती भावाने पायी आणली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात व महाशिवरात्री या दिवशी  वर्षातून दोन वेळा येथे भव्य साप्ताह आयोजित केला जातो.त्यामध्ये कीर्तन व महाप्रसाद चे आयोजन केले जाते. श्री निंबकेश्वर महादेव  मंदिर हे  गावाचे प्रमुख आकर्षण आहे .

दैतोबा  मंदिर

गावात श्री दैतोबा महाराज यांचे  चे सुंदर मंदिर आहे .दरवषी होळी च्या दिवशी गावात सात दिवसांचा भव्य साप्ताह चे आयोजन केले जाते .सात दिवस कीर्तन सेवा दिली जाते व शेवटच्या दिवशी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते व बारा गाड्या ओढण्याची परंपरा आहे ,तसेच होळी  च्या दिवशी गावात भव्य यात्रा भरवली जाते व आजुबाजू च्या परिसरातील भाविकांची मोठ्याप्रमाणात गर्दी  असते.